जेव्हा झाडावरचं फूल कलाकाराच्या कुंचल्यातुन कागदावर उतरतं तेव्हा ते असं दिसतं. अगदी छोट्याश्या स्पर्शाने देखील ओघळणाऱ्या या प्राजक्ताला आज मी फक्त बाॅलपेन आणि वॅक्स क्रेऑन वापरून अखेर कागदावर उतरवलंय; जिथून ते आता कधीच खाली पडणार नाही. या फुलातुन माझ्या कलेचा सुगंध दरवळत राहील अविरत... हर हर महादेव ! Name- Parijatak © Artist- Vishal Garad Material- Ball pen & wax crayons Time required- 2...
कर्नाटक राज्यातील नंबरवन दैनिक असलेल्या दैनिक विजयवाणी मधील लग्नाचा खर्च टाळून पुरग्रस्तांना केलेल्या मदतीची बातमी आज प्रसिद्ध झाली. पेपरात नुसतं नांव जरी आलं तरी लय भारी वाटतंय पण जवा आपली भाषा सोडून कन्नड पेपरात आपली एवढी मोठ्ठी बातमी लागते तेव्हा तर आभिमानानं ऊर भरून येतंय राव. समाजात जे काही चांगलं घडतंय त्याची स्वतःहून दखल घेऊन लाखो लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सच्चे...
बायकोची ओटी पुस्तकाने भरण्यामागचा माझा उद्देश वाचन संस्कृतीला बळ देणे व पुस्तकांची संगत जुळावी हा आहे. असा नाविण्यपुर्ण उपक्रम प्रत्येकानेच राबवायला हवा. माणसाच्या मेंदुला खऱ्या अर्थाने विचारशील बनवण्याचे सामर्थ्य पुस्तकांत असते. मी जेवढं साडेतीन शक्तीपीठांना मानतो. तेवढंच साडेतीन अक्षरांच्या 'पुस्तक' या शब्दालाही मानतो कारण माझ्या आजवरच्या जडणघडणीत यांनी खुप मोठा वाटा उचलला आहे. इथुन पुढील आमच्या संसारात जेवढं महत्व...
बॅण्ड बाजा बारातीला फाटा देऊन साखरपुड्यातच लग्न केल्याने त्यासाठीची रक्कम केरळ येथील पुरग्रस्थांना मदत म्हणून पाठवतोय. स्वतःच्या क्षणिक आनंदापेक्षा गरजवंतांचे आणि पुरग्रस्तांचे अश्रू पुसणे मला जास्त महत्वाचे वाटतंय. माझा संसार सुरू होत असताना दुसऱ्यांचा संसार उभा करण्याचा विचार मला जास्त आनंद देणारा आहे. तिथेही माझ्यासारखंच नवीन लग्न झालेलं दाम्पत्य असेल अशा पुर परस्थितीत त्यांचा सगळा संसार पाण्यात बुडाला असेल. त्यांच्यावर...
मित्रहो येत्या १९ ऑगस्ट २०१८ रोजी माझ्या विरा सोबत साखरपुड्यातच लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. साखरपुडा सकाळी ११:११ वाजता लग्न सोहळा दुपारी १२:४७ वाजता स्थळ : माऊली लाॅन्स, स्टेशन रोड, बार्शी निमंत्रक - प्रा.विशाल गरड
ती येतेय; विशाल गरडची बायको म्हणुन माझ्यासमवेत माझ्या कलागुणांचीही स्वामिनी बनून. लिहिता लिहिता राहिलेल्या रेषा पुर्ण करायला. विसरलेला एखादा शब्द आठवण करून द्यायला. थकलो तर बहरवायला, थांबलो तर चालवायला, रूसलो तर मनवायला, रागावलो तर शांत करायला, बावरलो तर सावरायला. ती येतेय; चित्रकाराचे चित्र बनून रंगायला, लेखकाचे अक्षर बनून उमटायला आणि वक्त्याचे शब्द बनून घुमायला. ती येतेय; एकांताचा यमदूत म्हणून तर...
शिवरायांच्या काळात युद्ध जिंकण्यासाठी एकाही मावळ्याने आत्महत्या केली नाही. रणांगणावर लढता लढताच प्राणांची बाजी लावली. स्वतःचा जिव देऊन प्रश्न सुटत नाही उलट जगुन लढण्याची जिद्द कमावता येते. आरक्षण हे माणसांनी तयार केलंय ते बंद करायचे वा चालू ठेवायचे. कुणास द्यायचे वा कुणास नाही. हे सगळं माणसांच्याच हातात असतं तेव्हा देव आणि निसर्गाच्या हातात असणाऱ्या जन्म आणि मृत्युचा फैसला तुम्ही करू...
लय दिसरात एक करूनशान लेकरं आभ्यास करत्याती. पोटाला चिमटं काढुन खिशाला कात्री लावून पै पै साठवून शिक्षणासाठी पैका गोळा करत्याती. मराठ्याची समदीच लेकरं लखपती आणि ईस्टेटवाली न्हाईती वं. ते आरक्षण कसं मिळत आस्तय, कोण देत आस्तय एवढा मोठा आभ्यास न्हाय बा आमचा पण न मागता मिळत नसतंय यवढंच ठांव हाय; म्हणुन ईनंती हाय मायबाप कोर्टाला, आयोगाला आन् सरकारला, आवं द्या...
राष्ट्रगीत सुरू झाल्यावर हिमा दासच्या डोळ्यातील ओघळलेल्या अश्रूंनी मनात घर केलं होतं. कधी एकदा ते कागदावर उतरवतो असं झालतं. आज हातात काळा आणि तांबडा बाॅलपेन घेतला व कोऱ्या कागदावर फिरवत बसलो. हातात बाॅल पेन, पेनच्या निपवर रोखुन धरलेले डोळे, पॅडवर निपचीत पडलेला कागद आणि हातातल्या बोटांना आदेश देणारा मेंदु यांच्या तीन तासाच्या अविरत युद्धानंतर हे चित्र साकार झाले. हे...
तीला जन्मू द्या, खेळु द्या, पळू द्या तीचा हाच वेग एक दिवस देशाचा स्पीड वाढवेल. गावकुसात गरिबीच्या विळख्यात जगणाऱ्या रणरागिणींनाही जग जिंकण्याची जिद्द बहाल करेल. तीचं फक्त नाक आणि कान टोचत बसण्यापेक्षा ती पळताना तीच्या पायाला टोचणारे खडे तीच्या झोपलेल्या स्वप्नांना जागे करतील. त्या रक्ताळलेल्या गोळ्याला पोटातुन बाहेर काढण्यापुर्वी विचार करा ती उद्याची हिमा, सिंधू, सायना, मेरी तर नसेल...