मित्रहो येत्या १९ ऑगस्ट २०१८ रोजी माझ्या विरा सोबत साखरपुड्यातच लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. साखरपुडा सकाळी ११:११ वाजता लग्न सोहळा दुपारी १२:४७ वाजता स्थळ : माऊली लाॅन्स, स्टेशन रोड, बार्शी निमंत्रक - प्रा.विशाल गरड
ती येतेय; विशाल गरडची बायको म्हणुन माझ्यासमवेत माझ्या कलागुणांचीही स्वामिनी बनून. लिहिता लिहिता राहिलेल्या रेषा पुर्ण करायला. विसरलेला एखादा शब्द आठवण करून द्यायला. थकलो तर बहरवायला, थांबलो तर चालवायला, रूसलो तर मनवायला, रागावलो तर शांत करायला, बावरलो तर सावरायला. ती येतेय; चित्रकाराचे चित्र बनून रंगायला, लेखकाचे अक्षर बनून उमटायला आणि वक्त्याचे शब्द बनून घुमायला. ती येतेय; एकांताचा यमदूत म्हणून तर...
शिवरायांच्या काळात युद्ध जिंकण्यासाठी एकाही मावळ्याने आत्महत्या केली नाही. रणांगणावर लढता लढताच प्राणांची बाजी लावली. स्वतःचा जिव देऊन प्रश्न सुटत नाही उलट जगुन लढण्याची जिद्द कमावता येते. आरक्षण हे माणसांनी तयार केलंय ते बंद करायचे वा चालू ठेवायचे. कुणास द्यायचे वा कुणास नाही. हे सगळं माणसांच्याच हातात असतं तेव्हा देव आणि निसर्गाच्या हातात असणाऱ्या जन्म आणि मृत्युचा फैसला तुम्ही करू...
लय दिसरात एक करूनशान लेकरं आभ्यास करत्याती. पोटाला चिमटं काढुन खिशाला कात्री लावून पै पै साठवून शिक्षणासाठी पैका गोळा करत्याती. मराठ्याची समदीच लेकरं लखपती आणि ईस्टेटवाली न्हाईती वं. ते आरक्षण कसं मिळत आस्तय, कोण देत आस्तय एवढा मोठा आभ्यास न्हाय बा आमचा पण न मागता मिळत नसतंय यवढंच ठांव हाय; म्हणुन ईनंती हाय मायबाप कोर्टाला, आयोगाला आन् सरकारला, आवं द्या...
राष्ट्रगीत सुरू झाल्यावर हिमा दासच्या डोळ्यातील ओघळलेल्या अश्रूंनी मनात घर केलं होतं. कधी एकदा ते कागदावर उतरवतो असं झालतं. आज हातात काळा आणि तांबडा बाॅलपेन घेतला व कोऱ्या कागदावर फिरवत बसलो. हातात बाॅल पेन, पेनच्या निपवर रोखुन धरलेले डोळे, पॅडवर निपचीत पडलेला कागद आणि हातातल्या बोटांना आदेश देणारा मेंदु यांच्या तीन तासाच्या अविरत युद्धानंतर हे चित्र साकार झाले. हे...
तीला जन्मू द्या, खेळु द्या, पळू द्या तीचा हाच वेग एक दिवस देशाचा स्पीड वाढवेल. गावकुसात गरिबीच्या विळख्यात जगणाऱ्या रणरागिणींनाही जग जिंकण्याची जिद्द बहाल करेल. तीचं फक्त नाक आणि कान टोचत बसण्यापेक्षा ती पळताना तीच्या पायाला टोचणारे खडे तीच्या झोपलेल्या स्वप्नांना जागे करतील. त्या रक्ताळलेल्या गोळ्याला पोटातुन बाहेर काढण्यापुर्वी विचार करा ती उद्याची हिमा, सिंधू, सायना, मेरी तर नसेल...
ही गोष्ट आहे सुमारे सात वर्षापुर्वीची मी पुण्यातील जंगली महाराज रोडवरील हाॅटेल सेंट्रल पार्क येथे अॅग्री बिझनेसच्या एका कोर्ससाठी ट्रेनर म्हणून राहत होतो. दिवसभर विविध क्षेत्रातील नामवंतांची लेक्चर्स व्हायची . त्यांच्याकडून खुप काही नवीन शिकायला मिळाल्याने एन्टरप्रिन्युअर बनलो. तिथुन जवळ असलेल्या मॅक्डोनाल्डच्या पाठीमागे दत्त भोजनालयात आमची मेस होती. जेवन झाल्यावर आम्ही संध्याकाळी निवांत असायचो तेव्हा एफसी रोड आणि जेएम...
माझे मित्र शरद तांदळे यांनी लिहिलेली "रावण" ही कादंबरी नुकतीच वाचून पुर्ण केली. रामायन हा भारतभूमीच्या ईतिहासातला कधी न पुसला जाणारा विषय आहे. परंतु आजवर पोथी पुराणातून आपल्याला श्रीराम जेवढे समजले तेवढे रावण नाही. आजच्या कलियुगात मात्र रामासोबत रावणाचा अभ्यासही महत्वपुर्ण ठरतो. रावण हा असुरांचा बलशाली राजा होता. त्रैल्योक्यात त्याच्या नावाची दहशत होती. तो शुर आणि तितकाच बुद्धीमानही होता...
आज सहजच माझा लहानपणीचा दोस्त राहुल पवारच्या टपरीवर मी आणि विकास जाधव गप्पा मारत बसलेलो. विकास आमच्याहुन खुप लहान परंतु आमचं लहानपण श्रीराम पेठेतल्या जनावराच्या दवाखान्यातल्या कंपाऊंडमध्ये खेळण्यात कसे गेले याचे एकसे एक किस्से त्याला सांगता सांगता मी आणि राहुल सुद्धा लहाणपणात पुरते विरघळून गेलो. लहाणपणीचे खेळ खेळताना हाता पायावर झालेल्या दुखापतींचे व्रण पाहिले की प्रौढावस्थेतुन थेट बाल्यावस्थेत प्रवेश...
सबसे पहले मेरे सभी मुसलमान भाई और बेहनोंको मै ईद के मौके पर दहेदिल से हार्दीक शुभकामनाए देता हूँ. हरसाल की तरह ईस साल भी काज्या के घर शिरकुर्मा खाने को गया था. काज्या मेरे बचपण का दोस्त हैं. दरअसल उसका नाम ईसरार काजी हैं लेकीन बचपन से हम सब दोस्त उसे काज्या केहते हैं. धंदा और व्यवहार उसको...