Don't underestimate the power of emerging seed because one day it becomes a big tree. At the time of emerging it requires sunlight but after full growth it gives us shadow. Author & Artist : Vishal Garad
मला बारावीच्या निकालाची खूप उत्सुकता लागली होती. त्यावेळी बारावी परिक्षेसाठी माझा नंबर महाराष्ट्र विद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आलता. मी ज्या वर्गात परिक्षा दिली त्या खिडकीतुन मामाचा पुतळा स्पष्ट दिसायचा. काॅलेज जीवनात कर्मवीर जगदाळे मामांच्या विचारांचा पगडा प्रचंड होता. एखादा प्रश्न येईना म्हणुन ईकडे तिकडे डोकावून जरी पहायचं म्हणलं तरी मामांचा पुतळा बघून हिम्मत होत नव्हती. जेवढं डोक्यात होतं तेवढंच कागदावर...
बदलत्या राजकिय ढंगात आता शुभेच्छा देण्याच्या पद्धतीसुद्धा बदलायला हव्यात. पहिले भिंती रंगवून शुभेच्छा असायच्या, मग डिजीटलवर आणि आता सोशल मिडीयावर. परंतु निवडणूकीच्या रणांगणात विजयी झालेल्या पदाधिकाऱ्याला जर त्या पदाची व स्थानिक संस्थेची माहिती देणारे पुस्तक भेट देऊन शुभेच्छा दिल्या तर ? हाच विचार करून मी सुद्धा नुकतेच शेवाळेवाडीचे सरपंच म्हणून निवड झालेले माझे मित्र अशोकरावजी शिंदे यांना दिपक पुरी...
आज स्वप्निल तुपे या शिक्षकाने घरी येऊन पुस्तक भेट दिली. तसं पहायलं तर पुस्तक भेट स्विकारण्यासाठी मी लय हावरट माणूस आहे. माझ्या वाढदिनी देखील अनेक दोस्त मंडळींनी मला पुस्तके देऊनच शुभेच्छा दिल्या. तुपे सरनी सुद्धा १८ मे लाच यायचा चंग बांधलेला पण मी म्हणलं "कुठं उन्हा तान्हाचं येत बस्ताव, सवडीनं या तुमच्या" मग आज अखेर पुस्तक, टोपी, गमज्या आणि...
सैराटच्या नावानं चांगभलं हा कार्यक्रम मनलावून बघीतला. आजवर एक अद्वितीय दिग्दर्शक म्हणुन नागराज आण्णा मंजुळे यांची केलेली भक्ती जणू हा कार्यक्रम पाहुण ते पावल्याचे समाधान लाभले. सिनेमा क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्यांसाठी हा कार्यक्रम एक अध्याय आहे; नव्हे तो एक अभ्यासक्रमच आहे असंच म्हणने योग्य ठरेल. हा कार्यक्रम आण्णांनी थेटरात जरी चार भागात रिलीज केला असता तरी सैराट एवढा चालला...
काल वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासुन आभार. स्वतःच्या वाॅलवर माझ्यासारख्या व्यक्तीचा फोटो शेअर केलेल्या हर एक दोस्ताचा ईथे नामोल्लेख करावासा वाटतोय पण प्रेम करणाऱ्या दोस्तांची संख्याच ईतकी आहे की प्रत्येकाचे नाव लिहायचे म्हणले तर पाच सात पाने तरी सहजच भरून जातील. मित्रहो तुमच्या प्रत्येकाच्या वाढदिवसादिवशी मलाही तुमच्याबद्दल भरभरून लिहून शुभेच्छा द्याव्या वाटतात पण माझ्या अधीकृत तीन अकाऊंट्स...
आजचा माझा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करून पांगरीला यायला दुपार झाली. सकाळपासुन उपाशीच असल्याने खुप भुक्याजलो होते. शेतात आल्यावर चिंचेच्या गार सावलीखाली पटकरात गुंडाळलेली भाकरी, मोकळी भाजी आणि कांदा असे पोटभरून जेवलो. वाढदिवसादिवशी यापेक्षा भारी डिश आणखीन काय असावी. यावर्षीपासुन दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त शेतात एक झाड लावण्याचा संकल्प केलाय. त्यानुसार भर उन्हात कुदळ आणि खोऱ्या घेऊन खड्डा खांदला आणि त्यात...
गहिनीनाथ दगडू लोखंडे उर्फ लोखंडे महाराज, वय वर्ष सत्तरहून जास्त, अंगावर एक ढवळं धोतर, मळका सदरा, गळ्यात तुळशीच्या माळा आणि डोक्यावर फेटा, व्यवसाय मिळेल तिथे काबाडकष्ट, राहायला एक पत्र्याचे शेड, शासनाची मदत शुन्य, शेतीतले उत्पन्न नगण्य, बस्स एवढ्याच जीवावर हा माणुस वृद्धाश्रम चालवतोय. मला माहिती मिळाल्यापासुनच या व्यक्तीला भेटण्याची ईच्छा झाली होती तेव्हा आजरोजी माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून भूम...
ड्रायव्हिंग करताना ओव्हरटेक हा कम्पल्सरी पार्ट आहे. आज ड्रायव्हिंग करताना समोर एक आयशर टेंम्पो चालत होता. खुप वेळ झाले ओव्हरटेक नाही करता आले. थोडे पुढे जाण्याचा प्रयत्न केला की लगेच समोरून एखादे वाहण यायचे पुन्हा गाडी लेफ्ट साईडला दाबावी लागायची. माझ्या गाडीची स्पीड पाॅवर समोरच्या आयशरपेक्षा जास्त असतानाही समोरून येणाऱ्या गाड्यांमुळे त्या गाडीला मागे टाकून पुढे निघून जाणे शक्य...