उठता फोन, बसता फोन चालता फोन, थांबता फोन आयुष्याच्या प्रायोरिटीत समद्यात वरी हाय रं फोन लिव्हायला फोन, वाचायला फोन बघाया फोन, ऐकाया फोन आयुष्याच्या प्रायोरिटीत समद्यात वरी हाय रं फोन हालका फोन, भारी फोन थ्रीजी फोन, फोरजी फोन आयुष्याच्या प्रायोरिटीत समद्यात वरी हाय रं फोन सुखात फोन, दुःखात फोन हसता फोन, रडता फोन आयुष्याच्या प्रायोरिटीत समद्यात वरी हाय रं फोन त्याच्याकडं फोन, तिच्याकडं फोन बंगल्यात फोन, झोपडीत फोन आयुष्याच्या प्रायोरिटीत समद्यात वरी हाय...
फक्त बाॅलपेन ने रेखाटलेले शेतकऱ्याचे दुःख दाखवणारे चित्र
मी एक होतो, आता लाख आहे नाहिस दिलेस तर आता लाथ आहे. फुटले पाय माझे, चालुनी डांबरावरती नाहिस मान्य केले तर ढेकळात अंत आहे. छळनं तूझं आसलं मला, पिढ्यानपिढ्या आहे केलेस माफ नाहीस तर तु नाशवंत आहे. कवर करू सेवा मी, जगणं मातीमोल आहे कर्ज फेडता फेडता माझा नरकात अंत आहे. भिक नको देऊ आम्हा, मागण्याचा हक्क आहे कबुल कर आता अन्यथा तलाख आहे. कवी तथा लेखक : प्रा.विशाल...
मी व्याख्यान करताना माझी ही छबी श्रोत्यांना एकदातरी पहायला मिळतेच. व्यासपिठावर बसलेल्या व्यक्तीवर एखादी कोटी करून श्रोत्यांसह प्रचंड हसण्याचा मोह मला टाळताच नाही. धीरगंभीर व्याख्यान मला करता येत नसल्याने व्याख्यानाचा परिपुर्ण आनंद मी स्वतः घेतो म्हणूनच श्रोताही आनंदी होतो. वक्ता जर हजरबाबी आणि मिश्किल असेल तर श्रोत्यांसाठी ती एक वैचारिक मेजवानीच असते. मी व्याख्यानाच्या पाच सेंच्युऱ्या मारल्यानंतर आत्ता कुठे...
दिनांक ०९ मार्च २०१८ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून वैरागमधील जिजाऊ ग्रुपने आयोजित केलेल्या माझ्या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन सोलापूर मध्ये गरिब भटक्या बालकांसाठी वंचितांची शाळा चालवणारे व गावाकडची जमीन विकून या बालकांसाठी आता निवासी शाळा काढण्याचे स्वप्न पाहणारे युवा समाजसेवक प्रसाद मोहिते आणि अनूताई मोहिते उपस्थित होत्या. आजच्या व्याख्यानात मला मानधनाच्या स्वरूपात मिळालेल्या रक्कमेतला काही वाटा मी...
मेरा देश बदल रहा है, झाडे तोड रहा है | झाडे तोडेगा इंडिया, तभी तो रस्ता करेगा इंडिया | शेकडो वर्ष लाखो वाटसरूंना व पंढरीच्या भक्तांना सावली दिलेल्या या जुन्या पिपरणीच्या वृक्षांची चौपदरी विकासाच्या नावाखाली शासनाने कत्तल केली. काल सातारा जिल्ह्यात व्याख्यानासाठी निघालो होतो तेव्हा पंढरपूर-सातारा मार्गावर वाखरीनजीक या शेकडो झाडांचे धड कापलेले दिसले. मी गाडी थांबवून अतिशय दुःखी होऊन या...
आज सकाळी काॅलेजला जाताना उक्कडगांपासुन तळ्याकडं जाणाऱ्या रस्त्यावर दोन लहाण मुले अनवाणी पायानं चिखल तुडवत चालताना दिसली, दोघंच बहिण भाऊ त्या सुमसान रस्त्याने चालताना बघुन मी गाडी थांबवली. खुप गोड आणि गोंडस परंतु तितकीच धाडसी असलेली हे लेकरं पाहुण मला माझं बालपण आठवलं. गावापासुन साधारणतः अर्धा किलोमिटरवर एक नदी वाहते त्या लेकरांची आई कदाचित तिथं धुणं धुवायला गेली असावी...
ऐन व्हॅलेंटाईन दिवशी सक्काळ सक्काळ त्या प्रिया वरिअरने ढिश्क्यांव केलं आन् तिच्या गुळीनं करोडो युवकांच्या ह्रदयाचा छेद घेतला. आपापल्या व्हॅलेंटाईन तशाच लपवून समदी तीच्याच गोळ्या छाताडावर झेलायला सरसावली. माणसाचं आंग म्हंजी या निसर्गाची एक आद्भुत निर्मिती हाय आन् त्यातला डोळा म्हंजी त्या निर्मितीचा प्राण. जिथं गाजायला कित्येक दशकं वाहून जातात तिथं ही पोरगी तीन तासाच्या पिच्छर मधल्या; साडे तीन...
आज रोजच्यागत काॅलेजवर निघालो व्हतो. आमचं काॅलेज निवासी आसल्यामुळं तीतं सुट्टी बीट्टीची भानगड नस्ती. डोंगरवाटेला लागल्यावर फुफ्फुटा उडवीत माझी हिरोव्हंडा निगाली व्हती; तेवढ्यात हागवण्याच्या वस्तीवर रोडच्याच कडंला भिमाभऊ वाट बघत बसल्यालं दिसलं. गाडी जवळ येताच त्यंनी मोठ्यांनं आरूळी ठुकली "अयंऽऽऽ सरंयययय...थांबा थांबा" मी बी लगीच ब्रेक मारला. भऊ हातातल्या पिवळ्या पिशवीत कायतरी घिऊन माझ्याकडे दमानं येतं व्हतं. जवळ आल्यावर...
तुझ्या एका नजरेत ईतकी ताकद आहे की; त्यापुढं लाखो शब्द आणि करोडो अलंकार निशब्द होऊन शेपुट घालुन बसतील. शेवटचा ठोका टाकायलेलं ह्रदय पुन्हा बाहत्तर ठोक्याकडे वळेल. मेंदुतल्या अब्जावधी पेशींना नवसंजीवनी मिळेल. बंद डोळे सुद्धा पापण्यांच्या कातडीला भेदून तुला पाहतील. अशातच जर हसलीस तू गालातल्या गालात; मग तर वाळवंटातही नद्या वाहतील, दगडातही झाडे उगवतील आणि हाडा मांसाच्या शरिराला प्रेमाचे अंकुर फुटतील. या दोन डोळ्यातले अंतर कमी करण्यासाठी हि दोन शरिरं रात्रंदिन झगडत...