आज दिनांक १८ एप्रिल २०१८ रोजी उस्मानाबादच्या विमानतळाजवळील स्वआधार प्रकल्पातल्या अनाथ मुलींच्या शुभहस्ते माझ्या संकेतस्थळाचे उद्घाटन झाले. ज्याला जो आनंद मिळत नाही त्याला तो देण्यातच खरा आनंद आहे म्हणुनच मी या संकेतस्थळाचे उद्घाटन या मुलींच्या हस्ते करण्याचे ठरवले होते. लॅपटाॅपवर एन्टरचे बटन दाबताना त्या मुलींना झालेला आनंद शब्दात नाही सांगता येणार परंतु त्यांच्या आयुष्यात संस्मरणीय ठरावा असा एक...

रेप

काल काश्मिरमध्ये असिफा या अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी मिळून केलेल्या बलात्काराची बातमी समजली आणि माणूस जातीत जन्म घेतल्याचीच लाज वाटू लागली. हा प्रकार जानेवारी महिण्यात घडला असुन अद्याप त्या नराधमांना शिक्षा झाली नाही उलट काही लोक त्याचे समर्थन करत आहेत. त्या अत्याचार करणाऱ्यांचा निषेध नोंदवायला बस्स माझ्याकडे एवढेच शब्द आहेत कारण अशा माणसावर थुंकणे म्हणजे थुंकण्याचा अपमान आहे, त्यांच्या...
आवं म्या कुठला बीजी माझ्यापरीस तर माझी आय जास्त बीजी हाय. घरातली समदी काम करता-करता पार झाक पडती पण हिजी कामं काय उरकत न्हायती. हिला निवांत बोलायचं म्हणलं की एकतर भाकऱ्या थापताना न्हायतर भांडी घासताना. आजबी आमच्या हौदापशी आय भांडी घासत व्हती आन् म्या आपलं गप्पा मारीत व्हतो त्येज्यातच फुटू काढायल्यालं बघून आयनं दोन खमंग डायलाॅग मारलं. "आरंय !...
आज सकाळी लवकर काॅलेजला निघालो होतो. उक्कडगांवचा ओढा ओलांडला तोच एका गाईच्या गोठ्याशेजारी दोन लहान मुलं गाडीला टेकून कुत्र्याच्या पिलाजवळ थांबलेली दिसली. रस्त्यानी धावणारी गाडी बघून चवताळून मागे लागणारी कुत्री त्या लेकरांपाशी मात्र शेपटी हलवत उभी होती. मी गाडी थांबवून त्यांचा फोटो घेतला. कुत्रीची पिल्ली दूध पिण्यासाठी तिच्या सडावर तुटून पडली होती. हे दृष्य पाहत उभी असलेली ती लहान...
आज घरी निवांत वाचत बसलो होतो. तेवढ्यात आमच्या वाड्यातल्या दरवाजाजवळ उभा राहुन कुणीतरी आवाज दिला. वहिनी दादा हायतं का ? मी उठुन पाहिलं तर आमच्या पेठेतलं रामभाऊ कदम उर्फ भऊ व्हतं. घरात आल्या आल्या आमच्या आईला म्हणलं "लई दिसं झालं दादाला भिटुन तवा मनलं कसं हायतं ती बगावं म्हणुनशीन आलुया". एवढ्या आपुलकीने ख्याली खुशाली बघायला आलेल्या भऊला पाहुण मला...
दि.२६ मार्च रोजी पुणे विभाग ग्रंथालय संघाच्या वतीने देण्यात येणारा ग्रंथप्रेमी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील विभागीय साहित्य पुरस्कार; ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा माजी सनदी अधिकारी मा.श्री.लक्ष्मीकांत देशमुख (भा.प्र.से) यांच्या हस्ते स्विकारला. सदर पुरस्काराचे वितरण सांगली जिल्ह्यातील चिखली येथे संपन्न झालेल्या पुणे विभाग ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात सन्मापुर्वक करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष...
बबनचा पहिल्याजुटचा शो बघाया मिळाला. आख्खा पिच्चर हुस्तोर कधी सुरू झाला आन् कधी संपला कळलच नाय. प्रिमियरला इंटरवल बिंटरवलची भानगड नस्ती त्यज्यामुळं आपुट पिच्चर सलग बगाया मिळाला. दोन तासाच्या आखंड पिच्चरमंदी भाऊराव कऱ्हाडेनी लई जीव वतलाय. गावाकडच्या माणसांला तर बबनमदल्या हारेक पात्रावुन जीव ववाळुन टाकू वाटलं आशी अॅक्टींग किलीया समद्यांनी. पिच्चरमदी सुरूवातीला पुलिस स्टेशनमदी साहेब पोट भरायला डबा उघडतंय...
दिनांक २२ मार्च रोजी कोथरूड मधील सिटी प्राईड येथे बहुचर्चीत 'बबन' या चित्रपटाच्या प्रिमिअरसाठी उपस्थित होतो. चित्रपट सुरू झाल्यानंतर त्यातलं कथानक अगदी पहिल्या डायलाॅगपासुनच गावात घेऊन गेलं. गावाकडचं जगणं, वागणं आणि बोलणं भाऊंनी चित्रपटाप्रमाणे थेटराच्या बाहेर सुद्धा तितकंच काटेकोर जपलं याची प्रचिती प्रिमिअरच्या आधी बबनच्या सर्व कलाकारांची सनया आणि हालग्याच्या निनादात बैलगाडीतुन काढलेली मिरवणूक पाहूण आली. प्रिमिअरसाठी प्रमुख पाहुणे...
पुणे विभाग ग्रंथालय संघाच्या वतीने देण्यात येणारा ग्रंथप्रेमी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील साहित्य पुरस्कार नुकताच मला जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण येत्या २६ मार्च रोजी सांगली जिल्ह्यातील चिखली येथे होत असलेल्या पुणे विभाग ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात; अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा.श्री.लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल-श्रीफळ व ग्रंथभेट असे ह्या पुरस्काराचे स्वरुप...
काही महिण्यांपुर्वी याच माळरानाला कास पठारची उपमा देऊन लेख लिहिला होता आज त्याच माळाला जळलेला माळ असं नांव देऊन लेख लिहित आहे. पहिला पाऊस पडल्यानंतर फुटणाऱ्या अंकुरापासुन सुरू झालेला गवताचा प्रवास अखेरीस राख होऊन संपतो. माळावर सहज चालता चालता किंवा मोहोळ वगैरे झाडताना गौरी पेटवण्यासाठी लावलेली आग जर वेळेवर नाही विझवली तर हजारो हेक्टरचे वाळलेले गवत जळून राख होतं....