दुधात मिठाचा खडा पडावा आणि क्षणात दूध नासावं तसं गेल्या महिनाभरात सभोवतालचे वातावरण नासले आहे. अनेक जवळचे नातेवाईक कोरोनामुळे गमवावे लागले. अजूनही काहीजण हॉस्पिटलमध्येच ऍडमिट आहेत. एखादा दिवस अपवाद वगळता रोजच कुणी ना कुणी पॉझिटिव्ह निघाल्याच्या बातम्या कानावर येत आहेत. वेळीच निदान करणारे घरी क्वारंटाईन होऊन बरे होत आहेत तर ज्यांनी दुखणे अंगावर काढले त्यांच्यासाठी बेड आणि...
हे सगळ्यांनीच अनुभवलंय तरीही या कवितेच्या शेवटच्या ओळीसाठी मला एवढ्या सगळ्या शब्दांची गुंफण करावी लागली. गेल्या पंधरा दिवसात आपण खूप जवळचे नातेवाईक गमावले आहेत, अजूनही काही झुंज देत आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याशिवाय आणि राहिलेल्यांना खबरदारी घ्या म्हणण्याशिवाय तूर्तास तरी आपल्याकडे काहीच शिल्लक नाही. कोरोनाचे तिमिर जावो आणि लवकरच चांगले दिवस येवो.
विकासकामे, शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या नावाखाली आजपर्यंत माणसाने करोडो झाडांच्या कत्तली केल्या आहेत. क्षणाक्षणाला रक्तातली ऑक्सिजन पातळी तापसणारा माणूस वातावरणातली ऑक्सिजन पातळी तपासायला विसरत चाललाय. याच विचाराला अनुसरून निदान या कोरोनाच्या भयंकर वातावरणात तरी आपल्या आयुष्यातील झाडांचे महत्त्व अधोरेखित व्हावे यासाठी लिहिलेली ही माझी काव्य रचना.
आजपर्यंत प्रत्येक गावातील नुसत्या समाज मंदिरांवर झालेला खर्च जर काढला तर कमीत कमी २० लाख जास्तीत जास्त १ कोटी एवढा आहे. त्या समाज मंदिरांचा उपयोग आजपर्यंत लग्नात जेवणावळीसाठी, सुगीत शेतमाल साठवणीसाठी, गणेशोत्सव व विविध जयंत्या साजऱ्या करण्यासाठी आणि फावल्या वेळेत पत्ते खेळण्यासाठी झाला. श्रद्धेपोटी आपण मंदिर, मस्जिद, चर्च करोडो रुपये खर्चून बांधले त्यामुळे माणसाच्या अशा वागण्याने देव...
आधीच लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्या पोलीस दलात सुमारे दिड लाख पोलिस कमी आहेत. आरोग्य विभागात सुद्धा लाखभर कर्मचारी कमीच आहेत अशा परिस्थितीत सरकारने कठोर निर्बंध लावले आहेत. कोणत्याच सरकारला वाटत नसते माणसं मरावी पण शेवटी एक वेळ येत असते जेव्हा हात टेकावेच लागतात. मग हिच ती वेळ जी आपल्या सर्वांना स्वयं निर्बंध घालून मारून न्यायची आहे.
वीस वर्षापूर्वी शाळेत जर गुरुजींनी कधी विद्यार्थ्यांना आवडते खेळ विचारले तर सर्रास पोरं सुरपारंबा, लप्पा छप्पी, शिवना पाणी, लंगडी, लिंबू चमचा, गोट्या, कुया, लोमपात, चिर घोडी असे मैदानी खेळ सांगायचे, दहा बारा वर्षापूर्वी याच प्रश्नाचे उत्तर कॅरम, बुद्धिबळ, सबसिडी, पत्ते, कोडी असे बैठे खेळ असायचे आणि या दोन तीन वर्षात मात्र गुरुजींच्या प्रश्नांचे उत्तर हे पब-जी,...
प्रथमतः साऊला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज माझ्या बापपणाला आणि विराच्या आईपणाला एक वर्ष पूर्ण झाली. साऊचा बाळूत्यात गुंडाळल्यापासून ते चालण्यापर्यंतचा प्रवास मागील एका वर्षात आम्ही अनुभवला. प्रत्येकाचे लेकरू त्यांच्या त्यांच्या आईबापाला लय अप्रूप असतं त्याला आम्हीही अपवाद नाहीत. लग्न का करावं, संसार का थाटावा त्या संसाराच्या वेलीवर ही कळी का फुलवावी याचे उत्तर म्हणजे लेकरू असतं....
शेतकऱ्यांची वीज कनेक्शन्स तोडण्याचे काम सुरू झालंय. वापरलेल्या विजेचे बिल भरायला हवे यात दुमत नाही पण बिल भरण्यासाठी शेतकऱ्याकडे तेवढे पैसे का नाहीत आले याचा विचार झाला असता तर बरे झाले असते. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे सगळा शेतमाल मातीत पुरावा लागला, जोडीला लहान सहान उद्योग होते ते पण बंद झाले. यावर्षी चार दोन पैसे पदरात पडतील या आशेने...
१००,००००००० प्रति महिना. (शंभर कोटी म्हणजे एकवर नेमके किती शुन्य असतात हे माहीत व्हावे म्हणून असे लिहिले) अरे काय बापाची पेंड आहे काय ? महाराष्ट्राची अर्धी संपत्ती फक्त या बड्या राजकारण्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या बुडाखाली आहे हे आज निदर्शनास आले. सदर आरोप कुणा ऐऱ्या गैऱ्याने नाही तर एका IPS अधिकाऱ्याने केले आहेत त्यामुळे यात काहीतरी तथ्य असेलच. खरंतर...
मुख्यमंत्री महोदय,तुम्ही नुसतं लॉकडाऊन करणार असं म्हणुस्तोर, दारूचा स्टॉक करायला सुरुवात झाली. किराणा दुकानात मालाची थाप्पी वाढली. दिड दोन लाख बिल करणारी कोविड सेंटर सुरू व्हायली. डुप्लिकेट सॅनिटायझरच्या कंपन्यांची कुलपं उघडली. शेतकऱ्यांकडून कवडी मोल भावात शेतमाल विकत घ्यायला सुरुवात झाली.