आज रोजच्यागत काॅलेजवर निघालो व्हतो. आमचं काॅलेज निवासी आसल्यामुळं तीतं सुट्टी बीट्टीची भानगड नस्ती. डोंगरवाटेला लागल्यावर फुफ्फुटा उडवीत माझी हिरोव्हंडा निगाली व्हती; तेवढ्यात हागवण्याच्या वस्तीवर रोडच्याच कडंला भिमाभऊ वाट बघत बसल्यालं दिसलं. गाडी जवळ येताच त्यंनी मोठ्यांनं आरूळी ठुकली "अयंऽऽऽ सरंयययय...थांबा थांबा" मी बी लगीच ब्रेक मारला. भऊ हातातल्या पिवळ्या पिशवीत कायतरी घिऊन माझ्याकडे दमानं येतं व्हतं. जवळ आल्यावर...
तुझ्या एका नजरेत ईतकी ताकद आहे की; त्यापुढं लाखो शब्द आणि करोडो अलंकार निशब्द होऊन शेपुट घालुन बसतील. शेवटचा ठोका टाकायलेलं ह्रदय पुन्हा बाहत्तर ठोक्याकडे वळेल. मेंदुतल्या अब्जावधी पेशींना नवसंजीवनी मिळेल. बंद डोळे सुद्धा पापण्यांच्या कातडीला भेदून तुला पाहतील. अशातच जर हसलीस तू गालातल्या गालात; मग तर वाळवंटातही नद्या वाहतील, दगडातही झाडे उगवतील आणि हाडा मांसाच्या शरिराला प्रेमाचे अंकुर फुटतील. या दोन डोळ्यातले अंतर कमी करण्यासाठी हि दोन शरिरं रात्रंदिन झगडत...
रोजची व्याख्याने, रोजचे काॅलेज, रोजचे लिखान आणि रोजचेच वाचन. यातुनही मिळाला थोडासा वेळ तर मग उचलतो पेन अन् गिरवीतो कोऱ्या कागदावर त्यातुनच मग निर्माण होते असे एखादे चित्र. माझ्या मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी फावल्या वेळातही स्वतःला कलेत बुडवून घेतो म्हणूनच डोक्यातले शब्द जिथल्या तिथं उतरंडी सारखे बसवतो म्हणजे मग बोलायला उभारल्यावर ते माझ्या दिमतीला उभारतात. चित्रकला जोपासण्यामागचे हेच आहे रहस्य.
video
प्रा.विशाल गरड यांचे पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील संपुर्ण भाषण.
video
Vishal Garad giving a fabulous speech on the occasion of Shivjayanti at Dharashiv (Osmanabad). Contact : 8888535282