एका आज्जीबाईची प्रतिक्रिया खास तिच्याच शैलीत बोरगाव येथील व्याख्यान आटोपून युवकांच्या सेल्फीचा अभिषेक स्विकारत गाडीकडे निघालो तोच एका कट्ट्यावर बसुन व्याख्यान ऐकत बसलेल्या आज्जीबाईंनी मला हाक मारली. मी त्यांना नमस्कार करताच त्या बोलू लागल्या. "आवं...काय भारी बोल्लासा तुम्ही, शिवाजी महाराज कसं वागलं ते लय समजलं बघा आयाबायावर बोलल्यालाव तर आम्हास्नी लय पटलं बघा. आवं आत्ताची पोरं आईबापाला सांभाळीत न्हायती पण आपल्या शिवाजी राजानं...
विचारांची पेरणी करतोय पण हे वाटतं तितकं सोप्प नाही. सकाळी नांदेड येथील व्याख्यान उरकून आज संध्याकाळचे उमरी तालुक्यातील कौडगांव येथे व्याख्यानासाठी निघालो. नविन गाव, नविन तालुका, नविन रस्ते आणि नविन माणसं पण फक्त एक गोष्ट ओळखीची ती म्हणजे शिवरायांचे विचार. बस्स याच एका कारणासाठी अतिशय खडतर रस्त्यावरून माझी गाडी धावू लागते. नांदेडहून गुरूजीच्या कारखान्यापर्यंतच जरा बरा रस्ता होता त्यानंतर...
भारतीय पोस्ट ऑफीसच्या वतीने सुरू केलेल्या माय स्टॅम्प उपक्रमा अंतर्गत आज माझे छायाचित्र असलेले पोस्ट तिकीट बार्शी तालुका पोस्ट ऑफीसचे उपविभागीय डाक निरिक्षक अमित देशमुख, पोस्ट मास्टर लतिफ शेख, उदय पोतदार, डाक आवेक्षक अजित नरगिरे, अमोल भताने यांनी मला सुपुर्द केले. यासाठी आमच्या बार्शीचे पोस्ट तिकीटांचा संग्रह जोपासलेले उदय पोतदार यांनी विशेष प्रयत्न केले. गेल्या महिण्यातच उदय सरांनी "सर...
उन्हाळ्याच्या उंबरठ्यावरच ती धावतेय रस्त्यावरून काळ्या आईच्या पोटातुन पाणी काढायला. आईची लेकरे सज्ज झालीत भुईची चाळण करायला. मातीबद्दलच्या प्रेमाचे झरे आटलेली माणसं पुन्हा सज्ज झालीत मातीच्याच पोटात लोखंडी पाईप घालुन पाण्याची वाट बघत बसायला. पावसाचा एक थेंब सुद्धा जिरवण्यासाठी प्रयत्न न केलेल्यांना खरंच त्या मातीत आपोआप मुरलेलं पाणी उपसायचा अधिकार उरतो का? आभाळातुन पडणाऱ्या पाण्याचं योग्य नियोजन नाही केलं...
आपलं नाव ही आपण करत असलेल्या कामाची सर्वोत्तम ओळख असते. हाडामासाच्या गोळ्याला समाजात ओळख देण्याचे काम आपलं नावच करत असते. एखादे नाव उच्चारलं की त्या नावाशी जोडलेल्या सर्व अभिव्यक्ती लगेच डोळ्यासमोर उभ्या राहतात. यशाची व्याख्या आपल्या सोयीप्रमाणे करता येते परंतु माझ्यामते लोकांसमोर आपलं नाव म्हणजेच आपलं काम हे बिंबवायला आपण यशस्वी होतो तेच खरे यश असते. आपण किती दिवस...
वाईट विचारांची कत्तल करण्यासाठी शब्दांचे छर्रे असलेली ही विचारांची बंदूक हाती घ्यायलाच हवी. विचारांना बंदूकीने मारणाऱ्याला शब्दांचे उत्तर शब्दांनी तर गोळीचे उत्तर गोळीनेही द्यायलाच हवे. विकृत समाज प्रवृत्तीला सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी स्वतःलाही जगवायलाच हवे. अक्षरांची काडतुसं घुसतील ह्रदयात पण नासलेल्या डोक्यात गोळ्या भरायलाच हव्या. स्वतःला मारून दुसऱ्यासाठी जगता येत नाही तेव्हा अंगावर येणाऱ्याला शिंगावर घेण्याची तयारी ठेवायलाच हवी. बंदुकीने माणूस मारून विचार मरत नाही...
तारूण्यात आल्यानंतर मिसरूट फुटलं की जाणतं झाल्याची भावना येते. लहान आसताना कधी एकदा मिशा येतात याची भारी हौस असते. मला सुद्धा दाढी मिशाची खुपच हौस होती. त्यात मिशा भरीव पिळदार आणि दाढी फुल असायला पाहिजे असे जणु स्वप्नच होते. लवकर दाढी यावी म्हणुन गुळगुळीत गालावर ब्लेडचा खोऱ्या फिरवणारे कित्येक मित्र मी पाहिले आहेत. परंतु माझी स्वप्नपुर्ती मात्र हे असले...
नेहमीच्या वाटेवरून येताना डोंगर उतरत व्हतो. भिमा भऊंनी मोठ्यानं आवाज दिला "अय्य सरंऽऽ...आवं या हिर बघाया, गाळ काढायला चालू हाय" आवतानास मान दिऊन मी हिरीवर थांबलो. वाकून बघितल्यावर डोळं गरगरत्याल यवढी खोल व्हती हिर. गाळ काढल्यामुळं हिरीचं बुजल्यालं झरं मोकळं झालं व्हतं, त्यंचा खळखळणारा आवाज समद्या हिरीत घुमत व्हता सोबतच हिरीत उतरल्याली माणसं क्रेनमदी गाळ भरण्यात आणि मशनीवरची माणसं...
काॅलेजला गाडीवर जाताना वाटेतल्या एका कोट्यावरची काही कुत्री भुंकत भुंकत रोज पाठलाग करतात. माझ्या गाडीचा आवाज आला की ती तयारच असतात कान टवकारून. विनाकारण भुंकणाऱ्या या कुत्र्यांचा मी कधी विचारच नाही केला किंवा त्यांना कधी घाबरलोही नाही; उलट ते भुंकत पाठलाग करायले की गाडी जास्त सुसाट चालवायचो. कधी कधी गाडी थांबवून मोठ्याने आर...हाऽऽऽड म्हणलं कि शेपटी मागच्या पायात घालुन...
आजच्या स्पेशल संडेची सुरूवात चिघळच्या भाजीची भाकरी, ठेसा, आंब्याच्या कैरीची चटणी आणि दही अशा पौष्टिक व रूचकर जेवणाने झाली. अर्थात विराच्या आधी आमच्या मातोश्री जर कधी भाकरी थापत बसल्या तर गरम-गरम पापुडा आलेल्या भाकरीचे चार घास पोटात घातल्याशिवाय कुठे जाऊ देत नव्हत्या. आता लग्नानंतर मातोश्रींसोबत विराचीही भर पडली. मास्टर ऑफ काॅमर्स असलेली विरा चुलीवर भाकऱ्या करण्यात सुद्धा मास्टरच आहे....