जेवण झाल्यावर सहज कुल्फी खाण्यासाठी गाड्यावर गेलो. इन बिन पंधरा सोळा वर्षाचं पोरगं मावा कुल्फी विकत होतं. अशी पोरं दिसली की माझा नेहमीचा प्रश्न असतो. "अरे शाळेत जातो का नाही" हाच प्रश्न मी त्यालाही विचारला तो म्हणला "सर, शाळेत न जाताच मला वाचायला येते. आमचे वडील पण नाही शिकले मी पण नाही. आमच्यात लहानपणापासूनच या धंद्यात टाकतात. शिजन मध्ये...
प्रतिकूल परिस्थितीत उगवलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वास हे चित्र अर्पण. मानवनिर्मित दगडी संकटांच्या छाताडावर उभारून मरणाच्या दारात पालवी फुटलेल्या बहाद्दरांना हे चित्र अर्पण. बहुतांशी अवयव निकामी झाल्यावरही जग जिंकलेल्या माणसांना हे चित्र अर्पण आणि कुऱ्हाड हातात घेऊन बसलेल्याला सुद्धा पाणी घालायला प्रवृत्त करणाऱ्या प्रत्येक झाडाला हे चित्र अर्पण. Name : Revival Artist : Vishal Garad Material : Ball Pen on paper Time required : 3...
तिच्या अंगावरचे काळे तांबडे पट्टे आणि झुपकेदार शेपटी ही तिची विशेष ओळख. कोऱ्या कागदावर तिला उतरवताना तिच्यासोबतच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. प्रत्येक रेषेगणिस तिच्या इटुकल्या पिटुकल्या उड्या आठवल्या, मागच्या दोन पायावर उभे राहून पुढच्या दोन पायात फळाचा एखादा तुकडा धरून अधून-मधून, खाली-वारी बघत-बघत खाताना आठवली, बाकी सोबतच्या चित्रात कागद आणि पेनचा खारीचा वाटा आहे आणि कलेचा सिंहाचा बरं. Name :...
प्रचार संपला निवडणुकीचे निकाल पण लागले आता नविन सरकार सत्तारूढ होईल. चारपाच आदल्या उडवून गुलाल उधळून जल्लोष होईल. घरी आल्यावर घरचे म्हणतील रानात जाऊन ये तेव्हा रानात मात्र झाडालाच उगवलेले सोयाबीन, मका, ज्वारी दिसेल तेव्हा प्रचार सभे एवढी गर्दी करून सरकारवर दबाव आणण्यासाठी एकी नाही होणार. शेतात भिजलेल्या सोयाबीनचे पुढे काय होणार यापेक्षा मुख्यमंत्री कोण किंवा कुणाचा होणार हे...
जिथे एका विधानसभेसाठी वीस तीस कोट पुरत नाहीत तिथं देवेंद्र भुयार सारखी माणसं लोकवर्गणीतून निवडून येतात. करोडो रुपयांची प्रॉपर्टी, आलिशान गाड्या, एकर दोन एकर वर उभारलेला मोठा बंगला, कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी बुक केलेले ढाबे यातले काहीच नव्हते त्याच्याकडे; होते ते फक्त संघर्षमय जिवन, ते ही स्वतः साठी नाही तर शेतकऱ्यांसाठी. मग काय जनतेने एकदा मनावर घेतले की काय होते याचे...
फटाकड्यांचे कितीबी प्रकार येऊ द्या पण याची दहशतच वेगळी. बालपणी अॅटमबाॅम्ब उडवणे म्हणजे मोठं झाल्याचे लक्षण होतं. अंगणवाडी बालवाडीत फुलबाजे, झाडे, प्राथमिक शाळेत असताना टिकल्या आणि नागगोळ्या, माध्यमीक शाळेत गेलो की लवंगी फटाकड्या किंवा तोटे आणि काॅलेजला गेलो की सुतळी बाॅम्ब असे काहिसं वर्गीकरण होतं आमचं. त्यातबी लहान असतानाच मोठ मोठे सुतळी बाॅम्ब फोडणारी पोरं अशी माचो वाटायची त्यांनाही...
कडेवर लेकरू घेऊन ती चालत होती. अचानक थांबली; एका हातातली बादली खाली टेकवली, गुडघ्यात थोडंसं वाकुन कडेवरचं लेकरू रोडवर झोपवलं आणि भांडी असलेली ती टोपली दोन्ही हातांनी अलगद खाली उतरवत ढिल्ली झालेली गाठ तीने घट्ट बांधली. सिमेंट रोडवरची तापलेली धूळ पोळत असेल त्याला पण साधं ऊंई नाही ना चुंई नाही केलं लेकरानं. हात पाय हलवत मस्त हसत हसत आईकडे...
माझी पेंटींग पोहचली अमिताभ बच्चनच्या घरात. कौन बनेगा करोडपतीच्या ऑडीयन्ससाठी आमच्या बार्शीचे उद्योजक योगेशजी अग्रवाल यांची निवड झाली होती. तेव्हा त्यांनी तात्काळ मला अमिताभजींना तुमची बाॅलपेन पेंटींग गिफ्ट करण्याची ईच्छा व्यक्त केली. मी हि लगेच अमिताभजींचे चित्र पुर्ण केले. १३ सप्टेंबरला प्रसारीत झालेल्या केबीसीच्या कार्यक्रमानंतर योगेशजींनी ती पेंटींग बच्चन साहेबांना सुपुर्द केली. अमिताभजींनी ती निरखून पाहिल्यानंतर त्यांच्या घरी घेऊन...
पाहताक्षणी हा फोटो साधारण वाटत असेल पण यात जेवण करणारे गृहस्थ आहेत जगविख्यात चित्रकार दस्तुरखुद्द शशिकांत धोत्रे. काल व्याख्यानानिमित्त हिंगणीला जाताना शशीदादाची भेट घ्यायची म्हणुन त्यांच्या शिरापूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. हा माणुस जगाची भ्रमंती करताना दसऱ्याची पुर्वसंध्येला निवांत भेटणे हा माझ्यासारख्या कलाप्रेमीसाठी सोनेरी क्षण ठरला. आमची चित्रकलेची जात एकच असल्याने भेटीचा प्रोटोकाॅल तोडत माझ्या आणि शशीदादाच्या जेवता...
आज काॅलेजहून येताना उक्कडगांवच्या नदीजवळ तीन-चार पोरं चकारी खेळताना दिसली. गाडी तात्काळ थांबवून प्राध्यापकाला गाडीलाच अडकवून लहानपणीचा विशल्या बनून त्यांच्यातल्याच एकाची चकारी आणि दांडा घेऊन त्यांच्यासोबत शंभर मिटरची रेस खेळलो. सोबतचा फोटो मी ज्याची चकारी घेतली होती त्यानंच टिपलाय त्याबद्दल त्यास धन्यवाद ! 'चकारी' हा लहानपणीचा माझा आवडीचा खेळ होता. त्यावेळेस या एका टायरची किंमत आमच्या जिवाला मोठ्या गाडीईतकी...