-
प्रा.विशाल गरड यांचे शिवचरित्रपर व्याख्यान | शिवजयंती प्रबोधन | Vishal Garad
धाराशिव जिल्ह्यातील बरमगाव (बु.) येथे दिनांक २० मार्च २०२२ रोजी संपन्न झालेल्या प्रा.विशाल गरड यांच्या जाहीर व्याख्यानातील निवडक भाग सदर व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
The selected part of the public lecture of Vishal Garad held on 20th March 2022 at Baramgaon (Bu.) In Dharashiv district has been published through this video.
व्याख्यानासाठी संपर्क : 8888535282
संकेतस्थळ : www.vishalgarad.com -
प्रा.विशाल गरड यांचे वृद्धाश्रमातील व्याख्यान | औरंगाबाद
संभाजीनगर (औरंगाबाद) येथील मातोश्री वृद्धाश्रमात दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी पार पडलेल्या प्रा.विशाल गरड यांच्या व्याख्यानातील काही संकलित भाग.
संयोजिका : ॲड.निकिता गोरे
Orator & Author Vishal Garad -
Batuk (बाटुक) | पुस्तक प्रकाशन सोहळा | मातोश्री वृद्धाश्रम औरंगाबाद | Author Vishal Garad
संभाजीनगर (औरंगाबाद) येथील मातोश्री वृद्धाश्रमात "वृद्धपकाळातील आनंदाचा शोध" या विषयावर माझे व्याख्यान संपन्न झाले तसेच यानिमित्ताने 'बाटुक' या पुस्तकाचे प्रकाशनही वृद्धाश्रमातील आज्जी आजोबांच्या हस्ते केले. सदर कार्यक्रम मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात कार्यरत असलेल्या युवा विधिज्ञ ॲड.निकिता गोरे यांनी आयोजित केला होता. वृद्धाश्रमात व्याख्यान देण्याचा माझा पहिलाच अनुभव असल्याने आता व्याख्यानात विषयाला न्याय देण्यासाठी नेमके काय विचार मांडायला हवेत यासाठी आठवडाभरापासून तयारी सुरू होती.
वृद्धावस्थेत दुःख कवटाळत बसण्यापेक्षा सुखाला शोधण्याचा प्रयत्न व्हायला हवा, दुःखाच्या पायथ्याशीच सुख लपलेले असते, वृद्धाश्रमात येण्याची प्रत्येकाची कारणे जरी वेगवेगळी असली तरी इथे मिळून राहण्याचा आनंद मात्र सर्वांचा सारखाच असतो. प्रेम बाजारात विकत मिळत नाही ते रक्तात निर्माण व्हावं लागतं आणि त्यासाठी त्या रक्तावर चांगले संस्कार व्हावे लागतात जे संस्कार करण्याचे सामर्थ्य आज्जी आजोबांमध्येच असते. असे अनेक विचार तासभराच्या व्याख्यानात मांडले.
मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक सागर पागोरे यांनी सुमारे साडेतीन एकरवर उभा असलेला हा विस्तीर्ण परिसर आणि त्यात राहणाऱ्या आज्जी आजोबांचे अतिशय सुंदर व्यवस्थापन केले आहे. तिथली स्वच्छता आणि नियोजन एवढे नीटनेटके आहे की ऐन तारुण्यात सुद्धा तिथे राहण्याचा मोह व्हावा. वृद्धाश्रमाबद्दल माहिती घेत असताना पागोरे साहेबांनी जेव्हा वृद्धांना या वृद्धाश्रमात टाकण्याची कारणे सांगितली तेव्हा माणूसपणाची लाज वाटावी एवढी ती भयंकर होती.
प्रकाशन आणि व्याख्यानानंतर काही आज्जी आजोबांनी डोक्यावर हात ठेवून, काहींनी पाठीवर हात फिरवून तर काहींनी हातात हात घेऊन ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या ऐकून नकळत डोळ्यात पाणी तरळले. माझी आजवर प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांच्या पंचवीस प्रती वृद्धाश्रमातील लायब्ररीला सुपूर्द करून निकिताने सर्वांना अल्पोपहार दिला. शब्द शिंपडून प्रचंड माया, प्रेम, ममता आणि जिव्हाळा वाटून सुंदर आठवणींचे क्षण हृदयात साठवून आम्ही आज्जी आजोबांचा निरोप घेतला.
याप्रसंगी जेष्ठ साहित्यिक ॲड.ललित जोशी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर त्यांच्यासमवेत, माजी न्यायाधीश शरदचंद्र भारुखा, पुष्पा अग्रवाल व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ॲड.निकिता गोरे, नीता वाघ, भाग्यश्री गोरे यांनी विशेष परिश्रम घेतले याप्रसंगी अमोल मिसाळ, वेणूगोपाल आगळे आणि नेहमीप्रमाणे आमच्या हनुमंताची मला विशेष साथ लाभली.
विशाल गरड
दिनांक : १५ ऑगस्ट २०२१ -
'बाटुक' प्रकाशन सोहळ्यातील मान्यवरांच्या भाषणांचा संकलित भाग
कार्यक्रमात विचार व्यक्त केलेले प्रमुख मान्यवर आणि मित्र मंडळी
१) डॉ.बी.वाय.यादव साहेब
२) संपादक राजा माने
३) जयकुमार बापू शितोळे
४) जेष्ठ पत्रकार तात्या बोधे
५) अभिनेता विठ्ठल काळे
६) उपसंपादक सचिन वायकुळे
७) व्याख्याते खंडू डोईफोडे
८) शुभम मिसाळ
९) विशाल चिपडे -
'बाटुक' पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील प्रा.विशाल गरड यांचे भाषण
दिनांक १ ऑगस्ट २०२१ रोजी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचे औचित्य साधून माझ्या बाटुक या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. डॉ.बी.वाय यादव, आमदार राजेंद्र राऊत, मा.संजीव सोनवणे, मा.राजा माने, मा.विश्वास बरबोले यांच्या हस्ते बाटुकचे प्रकाशन झाले. या सर्व मान्यवरांच्या सुंदर भाषणांनी कार्यक्रमाची उंची वाढवली तर जयकुमार शितोळे, अभिनेता विठ्ठल काळे, खंडू डोईफोडे, सचिन वायकुळे, तात्या बोधे, शुभम मिसाळ, विशाल चिपडे यांच्या मनोगताने कार्यक्रमात रंगत आणली आणि आकांक्षा देशपांडेच्या सुंदर सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम छान बांधला गेला.
'एका ठरवलेल्या चौकटीतले जीवन जगण्यापेक्षा युवकांनी साहित्य क्षेत्राकडे वळायला हवे, माझी पुस्तक निर्मिती म्हणजे माणसं जोडण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येकजण चौसष्ट कलांचा अधिपती असतो फक्त त्या स्वतः मध्ये शोधता आल्या पाहिजेत त्यातली एखादी जरी कला आपण आत्मसात केली तरी आपली ओळख अधोरेखित होते.' हे विचार मी लेखकाच्या मनोगतात मांडले. यासोबतच माझ्या वक्तृत्वाच्या सुरुवातीच्या काळातील काही मजेदार किस्सेही श्रोत्यांना ऐकवले. कोविडच्या कारणामुळे अगदी मोजक्या श्रोत्यांना निमंत्रित केले होते तरीही सभागृह भरून गेले.
कर्नाटकी शाल, ग्रंथ आणि सागवाण वृक्ष देऊन प्रमुख पाहुण्यांचा आम्ही यथोचित सन्मान केला तर पाहुण्यांच्या भाषणातून आणि श्रोत्यांच्या उपस्थितीतुन माझा सन्मान झाला. एका शब्दाला मान देऊन उपस्थित राहिलेल्या बार्शीतील राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, कला आणि साहित्य क्षेत्रातील प्रत्येक मान्यवरांचे आणि श्रोत्यांचे मी मनापासून आभार मानतो तसेच संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटलेल्या माझ्या सर्व जिवलगांस मी धन्यवाद देतो. तुम्ही आज कार्यक्रमासाठी दिलेला वेळ आणि प्रेम हा विशाल गरड सदैव स्मरणात ठेवेल.
विशाल गरड | Vishal Garad
दिनांक : १ ऑगस्ट २०२१
Cinematography & Edited by Jaysinh Pawar. -
Buchad | Official Trailer | Vishal Garad, Vaishnavi Janrao | Ingit Production
🎬 Movie credits :
Written & Directed by : Vishal Garad
Produced by : Ingit Production
Director of Photography : Sachin Nalawade
Screenplay & Dialogues : Vishal Garad
Editor : Amol Lohar
Make up : Balaji Kale
Production Manager : Hanumant Hipparkar
Lead Cast : Vishal Garad & Vaishnavi Janrao
बुचाड 'Buchad' is awarded by Best Shortfilm award in National Community Media Film festival, Telangana 2021 -
Vishal Garad Interview on 92.7 Big fm with RJ Pallavi
प्रा.विशाल गरड लिखित आणि दिग्दर्शित 'बुचाड' या लघुचित्रपटास मिळालेल्या राष्ट्रीय स्तरावरील यशाबद्दल आर.जे. पल्लवी यांनी सोलापूर बिग एफ.एम वर घेतलेली विशाल गरड यांची विशेष मुलाखत.
Broadcasted on 21 Feb 2021 at 9 to 11 am -
Kadambari Garad | Ball Pen Painting by Vishal Garad
खूप भारी अनुभव होता तिला पुन्हा कागदावर जन्माला घालतानाचा. जेव्हा संपुर्ण चित्र तयार झाले तेव्हा तिच्या डोळ्यात हरवून जाण्याचा आनंद एका बापासोबत माझ्यातल्या चित्रकारालाही सुखावणारा होता. लेकीच्या डोळ्यात पाहिलं की सगळा शिन विसरून प्रचंड मेहनत करण्याची उर्मी निर्माण होते. भाग्यवान असतात ते ज्यांच्या पोटी ही गोड जबाबदारी जन्म घेते.
Name : Kadambari
Artist : Vishal Garad
Material : Ball Pen on paper
Reference : Photo
Type : Free Hand
Time required : 5 hrs
Date : 18 Dec 2020 -
दैना | Dainna | Shortfilm | Official Release | Vishal Garad | Ingit Production
Dainna shortfilm based on millions of true lockdown stories. This film focused on how poor peoples suffering in lockdown situation. The film coments on employment, education, health and livelihood.
🎬 Movie credits :
Written & Directed by : Vishal Garad
Produced by : Ingit Production
Director of Photography : Amol Lohar
Screenplay & Dialogues : Vishal Garad
Background score : Rabbana
Editor : Amol Lohar
Sound Design : Maruti Lohar
Costume Design : Vira Garad
Make up : Balaji Kale
Production Manager : Hanumant Hipparkar
Lead Cast : Vishnu & Rukhmini Lohar
© copyrights : Ingit Production -
इंगित प्राॅडक्शन | Ingit Production | Announcement by Vishal Garad
माझा जन्म अनेक गोष्टी करण्यासाठी झाला आहे. आजवर मी जे जे काही केले त्या सर्व कालाप्रकारांना तुम्ही प्रेम दिलंय. व्याख्याने, बॉलपेन चित्र, पुस्तके, कविता, कॅलिग्राफीज या माध्यमातून मी व्यक्त होत आलोय. हे सगळे करत असताना माझ्याकडून आणखीन एक अपेक्षा तुम्ही सतत ठेवत आलात. तीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आज मी इंगित प्राॅडक्शन हाऊसची निर्मिती केली आहे. या बॅनरची प्रत्येक कलाकृती तुमचे मनोरंजन करण्यास सज्ज असेल. आजपर्यंत माझ्या डोक्यातल्या कल्पना माईकवर बोललोय, कागदावर लिहिल्यात, चित्रात उतरवल्यात पण आता सज्ज झालोय त्या पडद्यावर साकारण्यासाठी. तूर्तास 'इंगित' लक्ष्यात ठेवा, बाकी काळजावर कोरले जाईल याची गॅरंटी देतो.
काही गोष्टी आपण स्वतः ठरवून करत असतो तर काही गोष्टी समाज आपल्यातला हुनर ओळखून करायला भाग पाडत असतो. माझ्यासारख्या सर्वसामान्य युवकाला चित्रपट निर्मितीत पाऊल टाकायला प्रवृत्त करणारे तुम्हीच आहात. पुस्तकांच्या प्रोमोशनसाठी व्हिडीओच्या माध्यमातून भन्नाट संकल्पना राबवत राबवत हा प्रवास चित्रपट निर्मितीपर्यंत येईल असे कधी वाटले नव्हते पण कदाचित नियतीला माझ्या डोक्यातून काहीतरी उपसून मोठ्या पडद्यावर उमटवायची खुमखुमी आली असावी म्हणूनच इंगितच्या निर्मितीचा विचार माझ्या डोक्यात घातला असावा पण ते काहीही असो आता इंगित एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ठिणगी तर पडलीच आहे यावर फक्त तुमच्या प्रेमाची फुंकर टाकत राहा. हा पेटलेला निखारा कधीच विझणार नाही.
विशाल विजय गरड
निर्माता : इंगित प्राॅडक्शन
Ingit Films
Ingit Production
Ingit Entertainment
Date : 29 August 2020 -
व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय | पुस्तक प्रकाशन सोहळा | Author Vishal Garad
पुस्तकाचा लेखक म्हणून व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय या पुस्तकाचे आज प्रकाशन झाले असे जाहीर करतो. आजचे आगळे वेगळे पुस्तक प्रकाशन कसे झाले हे सविस्तर लिहिण्यापेक्षा ते तुम्हाला पाहण्यासाठी या चित्रफितीत अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत चित्रित केले आहे. हे पुस्तक आता सज्ज झालंय तुमच्या घराचा उंबरा ओलांडण्यासाठी आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नापर्यंत घेऊन जाण्यासाठी. आजपासून हे पुस्तक amazon या जगातल्या सर्वात मोठ्या ऑनलाईन स्टोअरवर उपलब्ध झाले आहे लगेच ऑर्डर करा किंवा पोस्टाने मिळवण्यासाठी संपर्क करा ७०२०९४१२४४ या नंबरवर.
लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २५ जुलै २०२० -
व्हय मलाबी लेखक व्हायचंय (Vhay malabi lekhak vhayachay) Official trailer | The Book | Vishal Garad
हे स्वप्न बाळगलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक एक वाट आहे, याला वाचल्यानंतर तुम्ही ठरवलेली गोष्ट घडण्याची शक्यता दाट आहे. यातला प्रत्येक शब्द न शब्द माझ्या हृदयातून थेट आहे. विश्वासाने सांगतोय दोस्तांनो, तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचा या पुस्तकात 'नेट' आहे.
लेखक : प्रा.विशाल गरड
Home Videos